पुणे- पुणे शहरातील भवानी पेठेतील हरकानगर जलवाहिनीवर काम करण्यात येणार असल्यामुळे उद्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यात पार्वती एमएआर टाकी, शंकरशेठ रोड, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण कुमार वैद्य स्टेडियम, लक्ष्मीनारायण टॉकीज , पर्वती दर्शन, सारस बाग, खडकमल अली, शिवाजी रोड, मुकुंद नगर, महर्षी नगर टीएमव्ही कॉलनी, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, अप्सरा टॉकीज, मीरा आनंद परिसर आणि श्रेयस सोसायटीचा समावेश आहे. तर शुक्रवारी २७ डिसेंबरला सकाळी उशिराने कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेने दिली आहे. तसेच पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
