पुणे पोर्श प्रकरणात आरोपीचा आजोबा उच्च न्यायालयात

पुणे- पुणे पोर्श कार अपघातातील आरोपीचा आजोबा सुरेंद्र अग्रवाल याने आपल्याला पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांनी बनाव रचून आपल्याला अटक केली असून आपली अटक चुकीची असल्याची याचिका त्याने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करुन घेतली असून लवकरच त्यावर सुनावणी होईल अशी अपेक्षा सुरेंद्र अग्रवालच्या वकिलांनी व्यक्त केली आहे.
पुणे पोर्शे कार अपघातातील अल्प वयीन आरोपी चे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याला या प्रकरणात ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोर्श कारने दुर्घटना झाली तेव्हा तो गाडी चालवत होता, असे ड्रायव्हरने सांगावे यासाठी या ड्रायव्हरवर दबाव टाकण्यात आला होता. त्यामुळे हा गुन्हा त्याच्या नातवाविरोधात नोंदला गेला नसता. या संदर्भात सुरेंद्र अग्रवालने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, आपण ड्रायव्हरवर कधीही जबरदस्ती केली नाही किंवा त्याला डांबले नाही. पोलिसांनीच हा बनाव रचून आपल्याला अटक केली. त्यामुळे आपली अटक चुकीची असून ती रद्द करावी. त्याची ही याचिका उच्च न्यायालयाने दाखल करुन घेतली असून पुढील आठवड्यात त्याची सुनावणी होऊ शकेल, असे सुरेंद्र अग्रवालच्या वकिलांनी सांगितले आहे. दरम्यान, अल्पवयीन आरोपीच्या रक्तचाचणीचे नमुने बदलण्यासाप्रकरणी आरोपीचे आई-वडील शिवानी व राहुल अग्रवाल तसेच मकानदार यांची न्यायालयीन कोठडी १४ दिवसांनी वाढवण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top