पाटण तालुक्यातील ९० गावांचा अदानींच्या वीजप्रकल्पाला विरोध

पाटण – सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळी धरण परिसरात उद्योगपती अदानी यांचा ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट नावाचा वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र या प्रस्तावाला तालुक्यातील ९० गावांनी आपला विरोध दर्शविला आहे. या गावांतून सुमारे २ हजार हरकती शासनाकडे दाखल केल्या आहेत.

तालुक्यातील तारळे आणि निवकणे या दोन ठिकाणी अदानी कंपनीचे वीजप्रकल्प उभारले जाणार आहेत. तारळे येथे १५०० मेगावॉट आणि निवकणे येथे २४५० मेगावॉट क्षमतेचे हे दोन प्रकल्प असणार आहेत. या प्रकल्पांना स्थानिकांना विश्वासात न घेताच शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात तब्बल ९० गावे एकत्र आली आहेत. या गावकर्‍यांनी आता हरकतीच्या अनुषंगाने उद्या १२ मार्च रोजी दुपारी १ वाजता तारळे सोसायटीच्या सभागृहात पर्यावरणवादी,सामाजिक संस्था, तज्ज्ञ मंडळी आणि कायदेशीर सल्लागारांची सभा आयोजित केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top