पाचगणीत वृक्षांची निवडणूक! सिल्व्हर ओक झाड पहिला क्रमांक

पाचगणी – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षांची निवडणूक हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
यासाठी पालिकेने स्थानिक, मूळ वृक्षांच्या निवडीवर आधारित निवडणुकीसाठी वृक्षांच्या यादीसह मतपत्रिका तयार करून नागरिकांना दिल्या आणि त्यांना त्यांच्या आवडीनुसार एका झाडाला मतदान करण्याची संधी दिली.निवडणूक बॅलेट पेपर आणि ईव्हीएम मशीन या दोन पध्दतीने मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. या निवडणूक कार्यक्रमात नागरिकांना शहरात लावायच्या झाडांच्या जाती निवडण्यास सांगितले. त्यानुसार अनेक नागरिकांनी मतदानात सहभागी होऊन आपल्या आवडीनुसार झाड निवडले. निवडलेल्या झाडांच्या यादीमध्ये सिल्व्हर ओक, पिसा, आसाने, गेला, वड, हिरडा, शिसम या स्थानिक वृक्षांचा समावेश करण्यात आला होता. हि निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर लगेचच निकाल घोषित करण्यात आला. या निवडणुकीत एकूण १७९० जणांनी मतदानाचा हक्क बजावला.या निवडणुकीत सिल्व्हर ओक या वृक्षाने सर्वाधिक ९८५ मते घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. वड-२१५, आसाने-१७९, शिसम- १४३, हिरडा-१०७, पिसा-८९, गेळा-७२ अशी मते मिळाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top