श्रीनगर -केरळ उच्च न्यायालयाचे तीन न्यायाधीश, न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन , न्या. जी गिरीश आणि न्या. पीजी अजितकुमार आणि त्यांचे कुटुंबीय काल मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावले. दहशतवाद्यांनी हल्ला करण्यापूर्वी काही तास आधी तेथून ते तिघेजण कुटुंबासह निघून गेले होते.
केरळचे हे तीन न्यायाधीश आणि त्यांचे कुटुंब १७ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीर राज्यात आले होते. त्यांनी कालपर्यंत राज्यातील अनेक जिल्हे आणि पर्यटन स्थळांना भेट दिली. त्यांच्या प्रवासाच्या वेळापत्रकात पहलगाममध्ये थांबण्याचा समावेश होता.त्यामुळे ते २१ एप्रिल रोजी त्या ठिकाणी राहिले आणि स्थानिक स्थळांना भेट दिली. त्यानंतर काल मंगळवार २२ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता न्यायाधीश आणि त्यांचे कुटुंब पहलगामहून निघाले आणि सुमारे ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीनगरला गेले.धक्कादायक बाब म्हणजे त्याच दिवशी
पहलगाम येथे हल्ला झाला.हल्ला