तिरुपती – आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या पत्नी अॅना लेझनोव्हा यांनी तिरुपतीत मुंडण करून मुलासाठी केलेला नवस फेडला. काल त्यांनी त्याची पूर्ती मंदिरात येऊन तिरूमला मंदिरात आपले मुंडण केले. यावेळी भगवान व्यंकटेश्वरांची पूजा करून त्या मंदिरातील अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्येही सहभागी झाल्या.
कल्याण यांचा मुलगा मार्क शंकर सिंगापूरमध्ये एका समर कॅम्पमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी आगीची दुर्घटना घडली. त्यात त्याचे हात आणि पाय भाजले. त्यानंतर त्याच्या सुरक्षेसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी अॅना यांनी व्यंकटेश्वर स्वामींकडे प्रार्थना केली होती.