परीक्षेचा पेपर लिहिताना विद्यार्थ्यांचा हृदयविकाराने मृत्यू

बीड – वर्गामध्ये परीक्षेचा पेपर लिहिता लिहिता एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बीडमधील के एस के महाविद्यालयात घडली.या विद्यार्थ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर शिक्षकांनी तातडीने त्याला दवाखान्यात हलवले. मात्र त्याने त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सिद्धार्थ राजेभाऊ मासाळ (२४) असे या परीक्षार्थी विद्यार्थ्याचे नाव आहे. बीड शहरातील सावरकर महाविद्यालयात सिद्धार्थ बीएससीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. तसेच तो स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्ली येथे अभ्यास करत होता. परीक्षा असल्याने तो बीडमध्ये आला होता. काल सकाळी बीएससीची परीक्षा देण्यासाठी तो के एस के कॉलेजमध्ये आला होता.
परीक्षा देत असताना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. शिक्षकांना ही माहिती समजल्याबरोबर त्यांनी तत्काळ रुग्णालयात घेऊन आले.मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.त्याचे वडील खाजगी गाडीवर चालक आहेत,तर आई एका दुकानात काम करते. त्याच्या आकस्मिक मृत्यूने त्याच्या आई-वडिलांना धक्का बसला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top