परभणीमध्ये जमावबंदी! इंटरनेटही बंद! ४० जणांना अटक!

परभणी- परभणीत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. त्यानंतर जिल्ह्यात आजही जमावबंदी लागू केली होती. पुढील आदेश येईपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे . या घटनेप्रकरणी पोलिसांनी आतापर्यत ४० जणांना ताब्यात घेतले आहे. परभणी शहरात काल दुपारी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर आता शांतता पसरली आहे. तर नांदेड परिक्षेत्राचे आईजी शहाजी उमप हे स्वतः परभणीत ठाण मांडून आहेत. परभणी शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

परभणीतील घटनेत काही व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे परभणीतील बाजारपेठ आजही बंद होत्या. काल झालेल्या दगडफेकीच्या प्रकारानंतर व्यापारी आज आक्रमक झाले होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top