पन्हाळगडावरील धर्मकोठडीत आता ऐतिहासिक म्युझियम

कोल्हापूर- पन्हाळा हा कोल्हापुरातील सर्वांत मोठा आणि आकर्षक किल्ला आहे.पन्हाळगडावरील धर्मकोठडी या वास्तूमध्ये वस्तुसंग्रहालय साकारले आहे.या म्युझियममध्ये महाराष्ट्रातील गडकोटांची छायाचित्रे आणि माहिती संकलित करण्यात आली आहे.

सध्या पन्हाळगडावर भारतीय पुरातत्व विभागाने डागडुजी करण्याची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे गडावरील ऐतिहासिक इमारतींचे रूप पालटण्यास सुरुवात झाली आहे. याठिकाणी असलेल्या म्युझियममध्ये दुर्मिळ फोटोंसह माहितीचे फलक लावले आहेत. काही वर्षांपूर्वी ही धर्मकोठी बंद ठेवण्यात आली होती.मात्र पर्यटकांची वर्दळ वाढत चालल्याने हे म्युझियम पुन्हा खुले करण्यात आले आहे. या गडाचे नाव जागतिक वारसा यादीत जाणार असल्याने गडाला गतवैभव देण्यास सुरुवात झाली आहे.