पंतप्रधान नरेंद्र मोदीला ओस दौऱ्यावर

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या लाओस दौऱ्यावर जात आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते २१ व्या एसियन इंडिया समिट व १९ व्या इस्ट इंडिया समिटला उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ही माहिती दिली.एसियन ही असोसिएशन ऑफ साऊथइस्ट अशियाई देशांची संघटना असून तिची स्थापना १९६७ मध्ये झाली होती. लाओस सध्या या संघटनेच्या अध्यक्षपदावर आहे. लाओसचे पंतप्रधान सोनेक्से सायकाडोने यांच्या निमंत्रणावरुन मोदी तिथे जात आहेत. या दौऱ्यात मोदी लाओसची राजधानी विएन्तियान मधील काही ठिकाणांनाही भेट देणार आहेत.