Who is Nikhil Kamath: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या पहिल्या वहिल्या पॉडकास्टचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत कोणत्याही पत्रकार अथवा सेलिब्रेटीने घेतलेली नाही. ही मुलाखत घेतली आहे ऑनलाइन स्टॉक ब्रोकरेज प्लॅटफॉर्म झेरोधाचे सह-संस्थापक आहेत.
या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे निखिल कामथ (Nikhil Kamath) यांच्या विविध प्रश्नांवर उत्तर देताना दिसतात. निखिल कामथ यांनी यापूर्वीही त्यांच्या पॉडकास्ट सीरिजसाठी बिल गेट्स, आनंद निलेकणी, कुमार बिर्ला सारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींची मुलाखत घेतली आहे. पंतप्रधान मोदींची मुलाखत घेणारे निखिल कामथ कोण आहेत, त्याविषयी जाणून घेऊया.
कोण आहेत निखिल कामथ?
निखिल कामथ (Nikhil Kamath) यांचा जन्म 5 सप्टेंबर 1985 ला कर्नाटकात झाला. त्यांनी शालेय शिक्षण देखील पूर्ण केलेले नाही. 10वी पूर्ण करण्याआधीच त्यांना शाळा सोडावी लागली. त्यामुळे त्यानंतर त्यांनी पुढचे शिक्षणच पूर्ण केले नाही. ते 14 वर्षांचे असल्यापासूनच नोकरी करू लागले. त्यानंतर त्यांनी कॉल सेंटरमध्येही 8 हजार रुपयांच्या पगारावर नोकरी केली.
पुढे 2006 मध्ये सब-ब्रोकर म्हणून काम करू लागले व भावासोबत मिळून कामथ अँड असोसिएट्स नावाची ब्रोकरेज फर्म सुरू केली. 2010 मध्ये त्यांनी भावासोबत मिळून झिरोधा या प्लॅटफॉर्मची सुरुवात केली होती. ते भारतातील सर्वात तरूण अब्जाधीश आहेत. 2024 मध्ये त्यांची संपत्ती 3.1 बिलियन डॉलर एवढी होती.