कुवेत – सिटीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुवेत दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी आज बायान पॅलेसमध्ये त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यावेळी त्यांच्यासोबत कुवेतचे अमीर शेख मेशल अल अहमद अल जाबेर अल साफा उपस्थित होते. त्यांनी नरेंद्र मोदी यांचा कुवेतचा सर्वोच्च ‘मुबारक अल-कबीर ऑर्डर’ देऊन सन्मान केला.या सोहळ्यात मोदी म्हणाले की, हा सन्मान १४० कोटी भारतीय लोकांचा असून मला सर्वोच्च सन्मान दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. भारत आणि कुवेतमध्ये दृढ आणि ऐतिहासिक संबंध आहेत. आता दोन्ही देश तेल आणि वायू क्षेत्रात धोरणात्मक भागीदारीसाठी सज्ज झाले आहेत.कुवेतचे अमीर शेख यांच्या निमंत्रणावरून मोदी कुवेतच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांचे कुवेतमधील भारतीयांनी जोरदार स्वागत केले होते. त्यांनी भारतीय कामगारांची भेटदेखील घेतली. मोदी हे ४३ वर्षांत कुवेतला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. कुवेतला भेट देणाऱ्या शेवटच्या भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. त्यांनी १९८१ मध्ये कुवेतला भेट दिली होती.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |