पंढरपूर – वीस दिवस पायी वारी करीत पंढरपूरला विठ्ठल – रुक्मिणीच्या दर्शनाला आलेल्या एका वारकरी महिलेचा आज पंढरपुरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालं. . द्वारका चव्हाण असे या महिलेचे नाव असून या दुर्दैवी घटनेबद्दल पंढरपूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे
बीड जिल्ह्यातील जातेगाव येथील द्वारका चव्हाण या गावातील विनायक महाराज मरकड यांच्या दिंडीत सहभागी होत्या. मागील २० दिवस आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत त्या बुधवारी (दि.१७) पहाटे पंढरपुरात आल्या. त्यानंतर चंद्रभागेत आंघोळ करुन त्यांनी पांडुरंगाला प्रदक्षिणा घातली. पंढरपुरातील लाखो वारक-यांचा आनंदमय (भक्तीमय) सोहळा पाहून या वारकरी महिलेचा विठ्ठल मंदिराच्या पायरी हृदयविकाराने मृत्यू झाला. या वारकरी महिलेच्या आकस्मित मृत्यूमुळे चव्हाण कुटुंबियांना धक्का बसला आहे.