नवी दिल्ली – पंजाब, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये येत्या मंगळवारपर्यंत कडाक्याची थंडी पडणार आहे,असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये मागील काही दिवस थंडी वाढली आहे. सकाळच्या वेळी दाट धुके आणि कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशीच परिस्थिती मंगळवारपर्यंत कायम राहील.किवा तापमानाचा पार आणखी जाण्याची शक्यता आहे,असे हवामान खात्याने म्हटले आहे.
