न्यूझीलंडने गायींच्या ढेकरावर लावलेला कर अखेर हटविला

वेलिंग्टन- काही वर्षांपूर्वी न्यूझीलंड सरकारने चक्क गाई, मेंढ्या यांच्या ढेकरवर कर लावला होता. या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. असा निर्णय घेणारा न्यूझीलंड जगातील पहिला देश ठरला होता. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीला न्यूझीलंड सरकारने ‘बर्प टॅक्स’ म्हणजेच ढेकरावर लावण्यात आलेला हा कर रद्द करण्याची घोषणा केली.

ऑक्टोबर २०२२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जॅसिंडा एडर्न यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बर्प टॅक्स लागू केला होता. शेतकरी या निर्णयामुळे अतिशय नाराज होते.जॅसिंडा एडर्न यांच्या लेबर पार्टीचा गेल्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये पराभव झाला आणि देशात नॅशनल पार्टीचे सरकार स्थापन झाले.याच नवीन सरकारने हा कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यूझीलंडमधील गायीच्या रुमिनंट प्रजातींमधून होणारे मिथेन वायूचे उत्सर्जन कमी व्हावे म्हणून हा कर आकारला होता.या गायींच्या शरीरात एक विशेष प्रकारची पचनसंस्था असते. रुमिनंट प्राणी आपल्या पोटात अन्न साठवतात,ते साठवल्यामुळे आंबते. प्राणी साठवलेले अन्नाचे रवंथ करतात. रुमिनंट प्राण्यांच्या पोटात चार कप्पे असतात,त्यापैकी एका कप्प्यात म्हणजे रुमेनमध्ये प्राणी अन्न साठवतात, हे अर्धवट पचलेले आणि आंबवलेले अन्न प्राणी पुन्हा चघळतात आणि पचन प्रक्रिया पूर्ण करतात.परंतु, रुमेनमध्ये गवत आणि इतर वनस्पती आंबतात.ज्यातून मिथेन वायू तयार होतो. मिथेन वायू हवामान बदलासाठी कारणीभूत असलेल्या मुख्य वायूंपैकी एक आहे.त्यामुळे न्यूझीलंड सरकारने हा कर लादला होता. त्याला शेतकर्‍यांनी विरोध केला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top