ओस्लो
युरोपियन अंतराळ प्रकल्पाला रविवारी मोठा धक्का बसला.उपग्रह प्रक्षेपण जलद करण्यासाठी विकसित करण्यात आलेले रॉकेट नॉर्वेमध्ये उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या ४० सेकंदातच कोसळले. त्यानंतर रॉकेटमध्ये स्फोट झाला. जर्मन स्टार्टअप इसार एरोस्पेसने याला प्रारंभिक चाचणी असे म्हटले आहे.
रॉकेट युरोपमधून यशस्वी प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करत होते.प्रारंभिक प्रक्षेपण अपेक्षेपेक्षा लवकर संपू शकते,असा इशाराही इसार एरोस्पेसने आधीच दिला होता. रॉकेटचा स्फोट होऊनही या घटनेमुळे भविष्यातील मोहिमांसाठी उपयुक्त ठरणारा महत्त्वाचा डेटा मिळाल्याचा दावा कंपनीने केला.
प्रत्येक उड्डाण आम्हाला डेटा आणि अनुभव देते,त्यामुळे ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.३० सेकंदांचे उड्डाण देखील आमच्यासाठी एक मोठी उपलब्धी असेल, असे इसार एरोस्पेसचे सह-संस्थापक आणि सीईओ डॅनियल मेट्झलर यांनी प्रक्षेपणापूर्वी सांगितले.
