नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

काठमांडू – नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. २७५ सदस्यांच्या संसदेतील १८८ सदस्यांनी पंतप्रधानांना पाठिंबा दिला तर ७४ सदस्‍यांनी त्यांच्या विरोधात मतदान केले. विश्‍वासदर्शक ठराव जिंकण्‍यासाठी केपी शर्मा ओली यांना १३८ खासदारांचे समर्थन आवश्‍यक होते. त्यापेक्षाही अधिक मतांनी त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला.

सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष व नेपाळचे पंतप्रधान  केपी शर्मा ओली यांनी  १५ जुलै रोजी 166 खासदारांच्या समर्थनाचे पत्र सभापती देवराज घिमिरे याना दिलेले होते. त्यामुळे त्यांच्याकडे  बहुमत असल्याचे स्पष्ट झाले होते. आज नेपाळी संसदेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला . त्यावर मतदान होऊन २७५  सदस्यांच्या सभागृहात ओली यांच्या बाजूने १८८  सदस्यांनी मतदान केले . आणि ओली यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यामुळे आता नेपाळमध्येओली यांचे   सरकार आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top