नॅशनल पार्कमधील झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी मरोळ-मरोशीतील भूखंड

मुंबई – बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (नॅशनल पार्क) पात्र झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी मरोळ-मरोशी येथील ९० एकरचा भूखंड देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या पुनर्वसन प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया १ डिसेंबरच्या आत सुरू करण्यात येईल,अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

नॅशनल पार्कमधील झोपडपट्टीवासियांची संघटना सम्यक जनहित सेवा संस्थाने यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी झाली. त्याप्रसंगी सरकारच्या वतीने ही माहिती देण्यात आली.
यापूर्वी नॅशनल पार्कमधील अनधिकृत झोपडया निष्कासित करून पात्र झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन अन्यत्र करण्याचे आदेश न्यायालयाने सन १९९७ आणि १९९९ च्या आदेशात दिले आहेत. त्यानुसार या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन दिलेल्या मुदतीत करण्याची जबाबदारी न्यायालयाने सरकारवर टाकली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top