Neeraj Chopra Marriage: भारताचे स्टार भालाफेकपटू आणि ऑल्मिपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा विवाहबंधनात अडकला आहे. नीरजने सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. त्याने फोटो शेअर करत पत्नीचे नाव देखील सांगितले. त्याच्या पत्नीचे नाव हिमानी मोर आहे.
नीरजने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो टाकतच हिमानीविषयी जाणून घ्यायला लोक गुगलवर तुटून पडल्याचे पाहायला मिळाले. हिमानी (Himani Mor) आणि नीरजने जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थित अत्यंत साध्या पद्धतीने विवाह केला आहे. या विवाहाबद्दल माध्यमांना देखील माहिती नव्हते. त्यामुळे लोक या विवाहाबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छूक असल्याचे पाहायला मिळाले.
कोण आहे हिमानी मोर?
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोर (Himani Mor) हरियाणाच्या सोनीपत येथील रहिवासी आहे. ती टेनिसपटू असून तिने लिटिल एंजेल्स पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर पुढील शिक्षण दिल्लीतील मिरांडा हाऊस कॉलेजमधून घेतले. हिमानीने फ्रेंकलिन पियर्स युनिव्हर्सिटीमध्ये वॉलंटियर असिस्टंट कोच म्हणूनही काम केले आहे. सध्या ती मास्टर्स इन स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे.
हिमानीने टेनिस खेळात भारताचेही प्रतिनिधित्व केले आहे. भारताकडून अंडर-14, अंडर-16 गटात प्रतिनिधित्व केले आहे. तसेच, ऑल इंडिया टेनिस असोसिएशन च्या (AITA) वेबसाइटनुसार, 2018 मध्ये हिमानीचे सर्वोत्तम राष्ट्रीय रँकिंग सिंगल्समध्ये 42 आणि डबल्समध्ये 27 होती.
नीरज चोप्राबद्दल सांगायचे तर त्याने टोकियो ऑल्मिपिक 2020 मध्ये सूवर्णपदक जिंकत इतिहास रचला होता. याशिवाय, त्याने 2024 पॅरिस ऑल्मिपिकमध्ये रौप्यपदक देखील जिंकले होते. त्याला पद्मश्री, विशिष्ट सेवा मेडल आणि परम विशिष्ट सेवा मेडलने देखील सन्मानित करण्यात आले आहे.