टोकिओ-निसान, होंडा आणि मित्सुबिशी या जपानी दिग्गज कार कंपन्यांनी एकत्र येण्याची घोषणा केली आहे. संयुक्त कंपनीसाठी सामंजस्य करार झाला असून, निसान आणि होंडा यांनी मिळून सर्वात मोठी कार कंपनी तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. इलेक्ट्रिक वाहनांत टेस्ला आणि बिल्ड युवर ड्रीम या चिनी कार कंपन्यांशी स्पर्धा करण्याची योजना म्हणून याकडे पाहिले जात आहे. मित्सुबिशी कंपनीने या संयुक्त कंपनीत सहभागी होणार आहे.
जपानमधील दिग्गज मोटार कंपनी होंडा आणि निसान यांच्यातील विलीनीकरण करार अस्तित्वात आल्यानंतर ही कंपनी जगातील तिसरी सर्वात मोठी मोटार उत्पादक कंपनी बनणार आहे. मित्सुबिशी मोटर्स कॉर्पोरेशनही होंडा-निसान युतीमध्ये सामील होऊ शकते. तीन कंपन्यांमध्ये स्वतंत्र सामंजस्य करार झाला आहे. जानेवारी २०२५ च्या अखेरीस ते त्याच्या सहभागाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून जागतिक ऑटोमोबाईल बाजारपेठेत निसान, होंडा आणि मित्सुबिशी या जपानी दिग्गज कार कंपन्यांच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होती. अखेर याच चर्चेला पूर्णविराम देत, या तिन्ही कंपन्यांनी एकत्र येण्याची घोषणा केली आहे आणि संयुक्त होल्डिंग कंपनीसाठी सामंजस्य करार केला आहे.