निवडणुकी पूर्वी ट्रम्पना अटक ?

वॅाशिंग्टन – अमेरिकेत सध्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन आणि डेमॅाक्रेटीक पक्षांमध्ये राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार निवडण्यासाठी मतदानाच्या फेऱ्या होत आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पार्टीतून उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. मात्र निवडणुकीपूर्वीचे त्यांना अटक करून तुरुंगात टाकले जाईल,असा गौप्यस्फोट माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे सल्लागार नार्म इसेन यांनी टिवटवर केला आहे.
वॉशिंग्टन,न्यूयॅार्क, फ्लोरिडा आणि जॅार्जिया येथे ट्रम्प यांच्यावर चार फौजदारी खटले दाखल आहेत.या खटल्यांत ट्रम्प यांना दीर्घ काळासाठी कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.ही निवडणूक होईपर्यंत खटले पुढे ढकलले जावेत,असा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे.
गेल्या शुक्रवारी जिल्हा न्यायाधीश तान्या छुटकन यांनी ट्रम्प यांच्यावरील एका खटल्याची सुनावणी काही काळासाठी पुढे ढकलली. ६ जानेवारी २०२१ रोजी ट्रम्प यांच्या समर्थकांनी राजधानीत हिंसक निदर्शने केली होती. त्याबाबतचा हा खटला आहे. या खटल्यात ट्रम्प यांना मिळालेला दिलासा तात्पुरता आहे,असे सूचक विधान इसेन यांनी सीएनएन या वृत्तवाहिनीशी बोलताना केला. याचा अर्थ ट्रम्प यांना निवडणुकीपूर्वी कधीही अटक होऊ शकते असा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top