निवडणुकीत खर्च जरा जपून. .प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढला. .

मुंबई
लोकसभा निवडणूक काळात निवडणूक आयोगाने विविध गोष्टींवर खर्च करण्याच्या रकमेची मर्यादा निश्चित केली आहे. 2022पर्यंत ही मर्यादा 75 लाख होती तर आता ती 95लाखापर्यंत वाढवण्यात आल्याचे राज्याचे सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी सांगितले. .त्या नुसार प्रत्येक जिल्हाधिकारी तेथील भौगोलिक परिस्थिती नुसार यात खाण्यापिण्यापासून तर निवडणूक साहित्य विक्रीच्या साहित्याचा खरेदीपर्यंतचे दर तेथील जिल्हाधिकारी निश्चित करतात निवडणूक आयोगाची या खर्चावर नजर असते. ..आता त्याचा तपशील त्याचा तपशील जाहीर करण्यात आला आहे, त्या नुसार गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाचे खर्चाचे दर 12 टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. यात शाकाहारी जेवण करायचे असेल तर त्यासाठी आता 100 ऐवजी 112 रुपये आणि मांसाहारसाठी 224 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. चहा, कॉफी, लस्सी, कोल्डड्रिक्ज, नास्त्याचे दरही वाढविण्यातआले आहेत . खर्चाचा प्रकार : २०१९ चे दर : २०२४ चे दर

चहा : ७ रुपये : ७.८४ रुपये

कॉफी : १२ रुपये : १३.४४ रुपये

लस्सी : २० : २२.४ रुपये

शीतपेय : २० रुपये : २२.४
स्नॅक्स,..25रुपये. .28रुपये

वाहन चालक : ४५० रुपये : ५०४ रुपये
गांधींटोपी. . ४.८० रुपये : ५.३७ रुपये

ढोल ताशे : २४०० रुपये : २६८८

ट्रॅक (दिवसाला भाडे) : ५५०० रुपये : ५६०० रुपये

कार (दिवसाला भाडे) : २७५० : २८००

दुचाकी (दिवसाला भाडे) : १९८ : २०१.६

सायकल (दिवसाला भाडे) : ६६ रुपये : ६७.२ रुपये राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून प्रत्येक दर निश्चित करण्यात आले आहेत असे पारकर यांनी सांगितले. .अर्ज केल्यापासून ते निकाल लागेपर्यंतचा खर्चाचा हिशेब निवडणूक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे. अर्ज भरताना उमेदवाराला २५ हजार रुपये अनामत रक्क जमा करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालायातील सेतू कार्यालयात निवडणूक कक्ष तयार करण्यात आला आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top