निर्जला एकादशी निमित्त पंढरीत भाविकांची गर्दी

सोलापूर

निर्जला एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात लाखो भाविकांनी गर्दी केली होती. आषाढी एकादशीपूर्वी येणाऱ्या या एकादशीला वारकरी संप्रदायात अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी सातारा, सोलापूर इतर राज्य आणि परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरात दाखल होतात. आजही एकादशीनिमित्त मंदिर परिसर, नामदेव पायरी, चंद्रभागा वाळवंट हा भाग वारकऱ्यांनी फुलून गेला. विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर‌ रोडवरील पत्रशेडपर्यंत गेली होती. विठ्ठल दर्शनासाठी भाविकांना सुमारे ५ तास रांगेत उभे राहावे लागले. भाविक विठ्ठलाचे नामस्मरण करत हळू हळू पुढे सरकत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top