पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आज सकाळी तब्येत अचानक बिघडली.त्यांना सर्दी आणि सौम्य ताप असून त्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी विश्रांती घेतली . त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर नितीश कुमार यांनी आपले कार्यक्रम पुढे ढकलले.
पाटणा ते राजगीरपर्यंत अनेक कार्मक्रमांना ते हजेरी लावणार होते. त्यात बिहार बिझनेस कनेक्ट हा महत्वाचा कार्यक्रम होता.या कार्यक्रमात बिहारचे ऊर्जा मंत्री विजेंद्र प्रसाद यादव यांनी सांगितले की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांची तब्येत बिघडल्यामुळे ते कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाहीत. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली बिहारचा विकासाचा गाडा पुढे नेत आहेत.आम्हाला पंतप्रधान मोदी यांचा मोठा पाठिंबा आहे.