Pune Techie Quits Infosys : सध्या कामाचे अतिरिक्त तास, ऑफिस कल्चर याची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकतेच एलअँडटी कंपनीचे चेअरमन एसएन सुसुब्रह्मण्यन यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्याला 90 तास काम करायला हवे, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर या चर्चेला अधिकच वेग पकडला. मात्र, कामाचा दबाव, कमी पगार, प्रमोशन न मिळणे या कारणांमुळे अनेक कर्मचारी नोकरीचा (Pune Techie Quits Infosys) राजीनामा देतात.
पुण्यातील एका इंजिनिअरने याच कारणामुळे इन्फोसिस (Pune Techie Quits Infosys) सारख्या कंपनीतील उच्च पदावरी नोकरी सोडली आहे. भूपेंद्र विश्वकर्मा या इंजिनिअरने लिंक्डइनवर पोस्ट करत आपण नोकरी का सोडत आहोत, याची कारणे देखील दिली. विशेष म्हणजे हातात दुसरी कोणती नोकरी नसतानाही त्याने हा निर्णय घेतला. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, अनेकजण त्यांचा अनुभव देखील शेअर करत आहेत.
नोकरी सोडण्याची कारणे
भूपेंद्र विश्वकर्माने नोकरी सोडण्याची (Pune Techie Quits Infosys) काही कारणे सांगितली आहेत. लिंक्डइन पोस्टमध्ये त्याने लिहिले की, मागच्या 3 वर्षांपासून कठोर परिश्रम करत आहे. मात्र, सिस्टम इंजिनिअरवरून सीनियर सिस्टम इंजिनिअर तर झालो, परंतु पगारात कोणतीच वाढ झाली नाही. टीममधील कर्मचारी कमी झाल्यानंतर नवीन कर्मचारी भरण्याऐवजी, जुन्या कर्मचाऱ्यांकडेच अतिरिक्त काम देण्यात आले.
याशिवाय, नुकसानीत असलेला प्रोजेक्ट सोपवण्यात आल्याने त्याचा परिणाम पगारवाढीवर झाला. अवास्तव अपेक्षा आणि लहान-लहान गोष्टींवर तक्रारी यामुळे नकारात्मक वातावरण तयार झाले. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक झाले; पण त्याचा पगारवाढ, प्रमोशन यावर कोणताही परिणाम झाला नाही. याशिवाय, हिंदी भाषिक कर्मचाऱ्यांऐवजी तेलगु, तमिळ, मल्याळम भाषा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक प्राधान्य दिले जात असे, असेही भूपेंद्र विश्वकर्माने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले. त्याची ही लिंक्डइन पोस्ट (Pune Techie Quits Infosys) सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.