नाशिक – त्र्यंबकेश्वर येथून भाविकांना नाशिकच्या दिशेने घेऊन निघालेल्या रिक्षा आणि कारची आज दुपारी समोरासमोर धडक झाली.यावेळी रस्त्यालगत उभा असलेला गुजरातच्या भाविकालाही या वाहनांची धडक बसली.या घटनेत या भाविकाचा मृत्यू झाला,तर ६ जण जखमी झाले.ही घटना अंजनेरी शिवारातील सीएनजी पेट्रोलपंपाच्या अलीकडे अंजनेरी फाट्यावर घडली.
रोहितभाई चौधरी (३५ )असे मृत भाविकाचे नाव आहे. सोलापूरहून त्र्यंबकश्वराच्या दर्शनासाठी भिसे कुटुंबीय त्र्यंबकेश्वर येथे आले होते.आज दर्शन घेऊन रिक्षातून नाशिकमार्गे ते परतीचा प्रवास करणार होते.अंजनेरी फाट्यावरून पुढे काही मीटर अंतरावर असलेल्या सीएनजी पंपासमोर कार आणि रिक्षाची धडक झाली.ही धडक इतकी भीषण होती की,रिक्षाचा चक्काचूर झाला.रिक्षामधील लहान मुले,महिला,पुरूष बाहेर फेकले गेले. त्यासोबत या वाहनांची गुजरातवरुन आलेल्या भाविकाला जोरदार धडक बसली.