नाशिक – नाशिकच्या पेठ, हरसुल, सुरगाणा भागात काल रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास भूकंपसदृश धक्के जाणवले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली नसली तरी स्थानिक तहसील कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला याची माहिती देण्यात आली आहे. जमिनीखाली सतत होणाऱ्या हालचालीमुळे हे धक्के जाणवत असल्याचे भूगर्भ शास्त्रज्ञाचे मत आहे.
