नाशिकच्या सिटी लिंकचे वाहक कर्मचारी संपावर

नाशिक
सलग 2 ते 3 महिन्यांचा पगार रखडल्याने नाशिक महापालिकेची सिटी लिंक बससेवेतील वाहक कर्मचाऱ्यांनी आज पहाटेपासून कामबंद आंदोलन सुरु केले. त्यामुळे बस डेपोतून सिटी लिंकची एकही बस रस्त्यावर धावली नाही. परिणामी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
याआधीही पगाराच्या मुद्द्यावरुन सिटी लिंक बस कर्मचारी संप गेले होते. मात्र कर्मचाऱ्यांचा आताही दोन ते तीन महिन्यांचा पगार रखडला. त्यामुळे कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले. एकही बस रस्त्यावर धावणार नसल्याचा आक्रमक पवित्रा आंदोलक कर्मचाऱ्यांनी घेतला. आज पहाटेपासूनच तपोवनमधील बस डेपोसह अन्य डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नाही. अचानक बस सेवा बंद झाल्यामुळे मात्र प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. प्रवाशांनी सांगितले की, वारंवार सिटी लिंक कर्मचारी संपावर जात असल्याने प्रवाशांचा या सिटी लिंक बससेवेवर भरोसा राहिला नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top