नाशिक – नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कंपनीला आग लागली. ज्योतिष स्ट्रक्चर या कंपनीत ही आग लागली. ही कंपनी काही दिवसांपासून बंद होती त्यामुळे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कंपनीतील एका प्लास्टिक टाकीला आग लागल्यामुळे मोठ्या प्रमणात धुराचे लोट पसरले होते.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या . अग्निशमन कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.