नालासोपाऱ्यात विजेच्या धक्क्याने एकाच मृत्यू

नालासोपारा :

नालासोपारा पूर्वेच्या टाकी रोडवरील साधना अपार्टमेंट या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेच्या झटक्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीच्या गच्चीवर पत्रा शेड बसवण्याचे काम सुरू होते. यासाठी लोखंडी पाईप बसवण्यात आले होते. शेडचे काम करत असताना लोखंडी पोल बाजूनेच गेलेल्या हाय टेन्शन वायरला स्पर्श करत होता. या लोखंडी पाईपाच्या संपर्कात आल्याने एका कामगाराला विजेचा झटका लागला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top