नालासोपाऱ्यात भरारी पथकाकडून साडेतीन कोटींची रोकड जप्त

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाने आज नालासोपारा मतदारसंघात कारवाई करीत साडेतीन कोटींची रोकड जप्त केली. रोकड असलेली एटीएम व्हॅन ताब्यात घेतली. त्यानंतर अधिक तपासासाठी पथकाने एटीएम व्हॅन नालासोपारा पोलीस ठाण्यात आणली. सदर प्रकरणावर पुढील तपास सुरू असून, व्हॅनमधील कर्मचाऱ्यांची चौकशी केली.