नागपूरमध्ये भीषण अपघातात ४ महिला शेतमजुरांचा मृत्यू

नागपूर – शेती कामासाठी आलेल्या महिला घरी परत जात असतानाच त्यांना घेऊन जाणाऱ्या टाटा सुमो गाडीला भीषण अपघात झाला.या अपघातात चार महिलांचा मृत्यू झाला.तर १३ महिलांसह चालक जखमी झाला.हा भीषण अपघात उमरेड तालुक्यातील सिर्सी चौकी हद्दीतील सालेभट्टी पेट्रोल पंपाजवळ काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला.
या अपघातातील मृतांची नावे – रत्नमाला मेश्राम, इंदिरा महाजन, सारिका बागडे आणि सोनाबाई सिद्धूके अशी आहेत.या सर्वजणी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील खरबी (माहेर) येथील राहणार्‍या होत्या. तसेच जखमींमध्ये तन्वी विनोद मेश्राम,दुर्गा विजय आडकिने,संगीता देविदास आडकिने,विना विक्रांत आडकिने,सोनाबाई सिंधू दुके,संध्या संतोष बाळगे, सरिता विजय नागपुरे, मनोरमा शांताराम मेश्राम, सावित्री बिसन आडकीणे, राजश्री राजेश्वर मेश्राम,बेबी ईश्वर मेश्राम,जनाबाई अर्जुन बावणे,अश्विनी अर्जुन बागडे व वाहनचालक शंकर मसराम यांचा समावेश आहे. त्यांच्यावर नागपूर मेडिकल कॉलेज रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या सर्व महिला उमरेड तालुक्यातील वायगाव येथील शुभम राऊत यांच्या शेतात चना कटाईसाठी आल्या होत्या.दिवसभर शेतातील काम केल्यावर एकूण१७ महिला पुन्हा आपल्या गावाकडे निघाल्या होत्या.टाटा सुमो गाडीमध्ये बसून त्या आपल्या गावाकडे निघाल्या असतानाच सालेभट्टी गावाजवळील अचानक वळण मार्गांवर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले.गाडीचा वेग असल्याने गाडी पलटी झाली.अपघात एवढा भीषण होता की पलटी झालेली गाडी थेट एका झाडाला जाऊन आदळली.यात तिघींचा जागीच मृत्यू झाला,तर सोनूबाई हिचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top