नागपूरमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद

नागपूर- महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स’तर्फे (ओसीडब्ल्यू) उद्या शहरातील विविध भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पेंच ४ एक्स्प्रेस फीडरवर २० तास शटडाऊन असल्याने उद्या सकाळी १० वाजल्यापासून, बुधवारी ११ डिसेंबर सकाळी ६ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शटडाऊन करण्यात आलेल्या कालावधीत ६०० मिलीमीटर व्यासाच्या हुडकेश्वर व नरसाळा टॅपिंगजवळ कंटेनर यार्डमध्ये फ्लो मीटर लावणार आहेत. त्यामुळे संबंधित लाइनशी निगडित पाण्याच्या टाक्यांवरून पाणीपुरवठा होणार नाही. सोबतच शटडाऊनच्या कालावधीत टँकरद्वारेही पाणीपुरवठा केला जाणार नाही, अशी माहिती महापालिकेच्या जलप्रदाय विभाग आणि पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीने दिली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top