नागपुरात भरधाव बसची ट्रकला धडक ! चार ठार

नागपूर- भिवापूर रोडवर आज भरधाव खासगी बसने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. त्यात चार जणांचा मृत्यू झाला, तर १० पेक्षा जास्त जण जखमी आहेत.ट्रकला धडक दिल्यानंतर बस हॉटेलमध्ये घुसली. त्यामुळे हॉटेलचेही मोठे नुकसान झाले. अपघात इतका भीषण होता की, बसच्या समोरील बाजूचा चेंदामेंदा झाला. या अपघातात स्थानिक लोकांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत बचावकार्य केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.