नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघिणतीन छाव्यांसह कॅमेऱ्यात कैद

गोंदिया – नवेगाव नागझिरा येथील जंगलात गेल्या दीड वर्षांपूर्वी व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या एनटी-२ वाघिणीने तीन छाव्यांना जन्म दिला आहे. हे छाव्यांच्या आईसह रानगव्याच्या शिकारी करतानाच्या हालचाली कॅमेर्‍यात कैद झाल्या आहेत. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संवर्धनासाठी वन विभागाने वाघाचे संवर्धन, स्थानांतरण, उपक्रमामध्ये आता पर्यंत एकूण ३ वाघिणी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थानांतरित करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये एनटी-१ व एनटी-२ ह्या वाघिणीला २० मे रोजी, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये एनटी-३ या वाघिणीला ११ एप्रिल रोजी नागझिरा वन्यजीव अभयारण्यात सोडले होते. यातील ट्रॅप कॅमेराद्वारा एनटी-२ वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवले होते. त्यात एनटी-२ वाघिणीचे प्रथमच तिच्या ३ छाव्यांसोबत रानगव्याची शिकार करतानाच्या हालचाली टिपल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top