नांदेडमध्ये शिख बांधवांचा मोर्चा! दुरुस्ती कायद्याला तीव्र विरोध

नांदेड- तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब नांदेड दुरुस्ती कायद्याच्या विरोधात संगत आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती आक्रमक झाली. समितीच्या नेतृत्वाखाली शिख बांधवांनी नांदेड गुरुद्वार ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत महाराष्ट्र सरकारवर आपली नाराजी व्यक्त केली. या मोर्चादरम्यान नांदेडमध्ये बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.
महाराष्ट्र सरकारने तख्त श्री हजूर साहिब व्यवस्थापन मंडळ नांदेड कायद्यात सुधारणा केली. नामनिर्देशित सदस्यांची संख्या वाढवली आहे. त्याचबरोबर व्यवस्थापकीय मंडळातील संगत आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या सदस्यांची संख्या चारवरून दोनवर आणली. विद्यमान मंडळातील एकूण सदस्य संख्या 17 असेल. यापैकी सरकार 12 सदस्यांची नियुक्ती करणार आहे. तर दोन सदस्य नामनिर्देशित केले जातील. इतर तीन सदस्यांची निवड निवडणूक प्रक्रियेतून केली जाणार आहे. यापूर्वी सरकारने नामनिर्देशित केलेल्या सदस्यांची संख्या सात होती. यासोबतच शीख संघटना चीफ खालसा दिवाणकडून सदस्य नामनिर्देशित करण्याचा अधिकारही काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे संगत आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती आक्रमक झाली. आज समितीने मोर्चा काढला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top