नवी मुंबई मेट्रोदरात ३३ टक्के कपात

नवी मुंबई- सिडकोने नवी मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. सिडको महामंडळातर्फे, बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये ३३ टक्क्यांपर्यंत लक्षणीय कपात करण्यात आली असून ०७ सप्टेंबर २०२४ पासून नवी मुंबई मेट्रो सेवेकरिता सुधारित तिकीट दर लागू होणार आहेत. सुधारित दरांनुसार तिकिटाचा किमान दर १० रुपये व कमाल दर ३० रुपये असणार आहे. जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय असणाऱ्या मेट्रोचा लाभ अधिकाधिक प्रवाशांना घेता यावा याकरिता तिकीट दरांमध्ये कपात केली आहे.

सुधारित तिकीट दरांमुळे जवळच्या तसेच लांबच्या अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही फायदा होणार आहे. सुधारित दरांनुसार पहिल्या ० ते २ कि.मी. आणि २ ते ४ किमी करिता रुपये १०, पुढील ४ ते ६ किमी आणि ६ ते ८ किमीसाठी रुपये २० आणि ८ ते १० किमीच्या टप्प्यासह त्या पुढील अंतराकरिता ३०रुपये, असे तिकीट दर लागू होणार आहेत. यापूर्वी बेलापूर टर्मिनल ते पेंधर टप्प्याकरिता तिकिटाचा दर रु. ४० इतका होता, हा तिकीट दर आता ३० रुपये असणार आहे. सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर विकसित करण्यात आला आहे. या मार्गामुळे सीबीडी, तळोजा एमआयडीसी आणि सिडकोच्या खारघर येथील गृहसंकुलांची सोय होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top