Best Smart TV Under 15000: स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असल्यास जास्त पैसे खर्च करावे लागतात, असे अनेकांन वाटते. मात्र, तुम्ही कमी किंमतीत येणारा अगदी चांगला स्मार्ट एलईडी टीव्ही खरेदी करू शकता. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर अगदी 15 हजारांच्या बजेटमध्ये येणारे शानदार टीव्ही उपलब्ध आहेत. कमी किंमतीत येणाऱ्या या स्मार्ट टीव्हींविषयी जाणून घेऊयात.
Acer 32 inches I Pro Series HD Ready Smart LED Google TV
Acer चा 32 इंच स्मार्ट टीव्ही फक्त 10,499 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. टीव्हीवर 10 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहे. यावर कॅशबॅक, एक्सचेंज ऑफरचाही फायदा मिळतो. हा टीव्ही 1.5GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज, 60Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येणारा डिस्प्ले, 30 वॉट साउंड आउटपुटसह डॉल्बी ऑडिओ सपोर्ट देखील मिळतो.
Xiaomi Smart TV 32 HD Ready Smart Google LED TV
Xiaomi चा हा स्मार्ट टीव्हीवर अॅमेझॉनवर 12,490 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या टीव्हीवर 10 टक्क्यांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट, 375 रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर 2,830 रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये 32 इंच एलईडी डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. हा डिस्प्ले विविड पिक्चर इंजिनसह येतो. शाओमीच्या या टीव्हीमध्ये तुम्हाला 20 वॉटच्या साउंड आउटपुटसह डॉल्बी ऑडिओ आणि डीटीएस वर्च्युअल: X देखील मिळेल.
TCL 32 inches Metallic Bezel-Less S Series Full HD Smart LED Google TV
TCL च्या या टीव्हीमध्ये 1.5GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. यात 32 इंच डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे. दमदार साउंडसाठी या टीव्हीमध्ये 24 वॉट आउटपुटसह डॉल्बी ऑडिओ सपोर्ट मिळतो. हा टीव्ही अॅमेझॉनवर 12,490 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. टीव्हीवर फ्लॅट डिस्काउंट, कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल.