Best Smartphones Under 15000: भारतीय बाजारात 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सची मोठी मागणी आहे. या बजेटमध्ये अनेक चांगले 5जी फोन्स बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही देखील या बजेटमध्ये येणारा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर CMF Phone 1, Poco M7 Pro 5G आणि Redmi 13 5G चा विचार करू शकता. या स्मार्टफोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Poco M7 Pro 5G
Poco M7 Pro 5G मध्ये 6.67-इंच FHD+ AMOLED स्क्रीन दिली असून यात 120Hz रिफ्रेश रेट सह स्मूथ आणि ब्राइट विज्युअल्सला सपोर्ट मिळेल. फोनमध्ये MediaTek Dimensity 7025 Ultra प्रोसेसरसह 8GB पर्यंत रॅम मिळते.
यात 50MP मुख्य कॅमेरा आणि 20MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. तर पॉवरसाठी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,110mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन HyperOS (Android 14) वर काम करतो. फोनचे 6जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येणारे व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 13,999 रुपयात उपलब्ध आहे.
Redmi 13 5G
Redmi 13 5G चे 6 जीबी रॅम आणि 128 जीबी व्हेरिएंट Amazon वर 11,700 रुपयात उपलब्ध आहे. यामध्ये 6.79 इंचाचा शानदार डिस्प्ले देण्यात आला असून, यात 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट मिळेल. डिस्प्ले एलसीडी पॅनेलसह येतो.
यामध्ये फोटोग्राफीसाठी 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी मिळेल. हा फोन HyperOS (Android 14) वर काम करतो.
CMF by Nothing Phone 1 5G
CMF by Nothing Phone 1 5G च्या 6जीबी+128जीबी व्हेरिएंटला Amazon वरून 14,097 रुपयात खरेदी करू शकता. फोन MediaTek Dimensity 7300 प्रोसेसरसह येतो. यामध्ये 6.67-इंचाची Super AMOLED स्क्रीन देण्यात आली असून, ही शानदार व्ह्यूइंग अनुभव प्रदान करते. यामध्ये 50 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, 5,000mAh ची बॅटरीसह अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत.