होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया ने (HMSI) भारतात त्यांची लोकप्रिय स्कूटर Honda Dio चे नवीन मॉडेल लाँच केले आहे. या नवीन स्कूटरमध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहे. सोबतच, OBD2B-कम्प्लायंट इंजिन देखील देण्यात आले आहे. यामध्ये नवीन 109.51 सीसी इंजिन, आयडलिंग स्टॉप सिस्टम, 4.2 इंचचा टीएफटी डिस्प्ले आणि यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्टसह अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतील. 2025 Honda Dio च्या किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊयात.
2025 Honda Dio ची किंमत
नवीन 2025 होंडा डिओच्या बेस वेरिएंट डिओ STD ची किंमत 74,930 रुपये (एक्स-शोरूम) आणि डिओ DLX ची किंमत 85,648 रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही स्कूटर इंपीरियल रेड मेटॅलिक, पर्ल इग्नियस ब्लॅक, पर्ल इग्नियस ब्लॅक + पर्ल डीप ग्राउंड ग्रे, मॅट मार्व्हल ब्लू आणि मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक अशा 5 आकर्षक रंगांत येते.
2025 Honda Dio चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
नवीन होंडा डिओ स्कूटर लूकमध्ये खूपच स्टायलिश आहे. यामध्ये एलईडी लाईट्स, आरामदायक सीट्स, आकर्षक ग्राफिक्स आणि रुंद टायर्स देण्यात आले आहेत. या स्कूटरमध्ये 4.2 इंचाचा टीएफटी डिस्प्ले दिला असून, यात मायलेज इंडिकेटर, ट्रिप मीटर, इको इंडिकेटर आणि डिस्टन्स टू एम्प्टी यांसारखी माहिती मिळते. मोबाईल चार्जिंगसाठी यामध्ये USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट देखील देण्यात आला आहे. डिओच्या टॉप-स्पेक DLX व्हेरिएंटमध्ये अलॉय व्हील्स मिळतील.
इंजिनबद्दल सांगायचे तर नवीन डिओ स्कूटरमध्ये 109.51 सीसीचे सिंगल-सिलेंडर PGM-Fi इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन 5.85 kW ची पॉवर आणि 9.03एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यामध्ये आयडलिंग स्टॉप सिस्टम देखील दिले आहे, ज्यामुळे इंधनाची बचत होते व अधिक चांगले मायलेज मिळते.