नववीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे- राजगुरुनगर येथील नववीत शिक्षण घेत असलेल्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.काल बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्नेहा एकनाथ होले (१५) असे या मृत मुलीचे नाव असून ती खेड तालुक्यातील होलेवाडीत राहणारी होती. स्नेहा होले ही राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालय इयत्ता नववीत शिकत होती.काल सकाळी ती रोजच्या प्रमाणे शाळेत आली होती.शाळेत स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यान कार्यक्रमाला बसली होती.

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तिला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तिला अचानक चक्कर आली.त्यामुळे शिक्षकांनी तात्काळ तिला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.यावेळी स्नेहाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.स्नेहाच्या पश्चात एक भाऊ,आई ,वडील असा परिवार आहे.या घटनेने होलेवाडी आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top