नववर्ष स्वागतासाठी १० दिवस रायगडचे हॉटेल्स बुकिंग फुल्ल

अलिबाग- सरत्या वर्षाला निरोप देतानाच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी रायगडातील निसर्गरम्य किनारे गाठण्याचे बेत आखले आहेत.यासाठी गेल्या आठवड्यापासूनच हॉटेल,होम स्टे तसेच खासगी बंगल्यांचे बुकिंग करण्यास सुरुवात केली असून दर दुपटीने वाढले आहेत.त्यामुळे दहा दिवस आधीच रायगडातील हॉटेल, रिसॉर्टचे बुकिंग फुल्ल झाले आहे.

पुढील आठवड्यात २५ डिसेंबर नाताळपासूनच ३१ डिसेंबरपर्यंत पर्यटकांची मोठी गर्दी होणार असल्याने अलिबाग,मुरुड, उरणमधील किनाऱ्यांवर पोलिसांनी नजर ठेवण्यासाठी पथके तयार आहेत.मुंबई, ठाणे तसेच पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्याने पर्यटक रायगडातील समुद्रकिनाऱ्यांना पहिली पसंती देतात.त्यामुळे दरवर्षी दिवाळी,उन्हाळी सुट्टया, नाताळ,थर्टीफर्स्टला मुरुड,अलिबाग,काशिद, श्रीवर्धन तसेच उरणमधील किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी होते.यंदाही दहा दिवस अगोदरच हॉटेल, रिसॉर्ट, होम स्टेसाठी आगाऊ बुकिंग करण्यात आल्याने सर्वच ठिकाणी हाऊसफुल्लचा बोर्ड झळकला आहे.एरवी हजार, १२०० पासून असणारे रूम भाडे आता थेट दोन हजारांपासून दहा हजारांवर गेले असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top