मुंबई – ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने राज्यातील दारूची दुकाने, पब आणि बार यांच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृह विभागाने याबाबतचे आदेश जारी करण्यात आलेत.
गृह विभागाच्या आदेशानुसार, 24 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर असे तीन दिवस दारूची दुकानाची वेळ वाढवण्यात आली आहे. दारूची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर पब आणि बार यांना पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारी परवान्यानुसार दारूची दुकाने सुरू ठेवण्याबाबत राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता लक्षात घेऊन परवानगी नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे