नफेखोरीमुळे शेअर बाजार कोसळला सेन्सेक्स १२७२ अंकांनी घसरला

मुंबई – शेअर बाजारासाठी आठवड्याची सुरुवात आज अत्यंत खराब झाली. नफेखोरांनी विक्रीचा सपाटा लावल्याने बाजारात जोरदार घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सक्समध्ये १२७२ अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बादजाराच्या निफ्टी, बँक निफ्टीसह सर्वच निर्देशांकांत एक ते दीड टक्क्यांची घसरण झाली.आज दिवसभरात सेन्सेक्समध्ये १३०० अंकांची घसरण झाली होती. बाजार बंद होताना त्यात थोडी सुधारणा होत सेन्सेक्स १२७२ अंकांच्या घसरणीसह ८४,२९९ अंकांवर तर निफ्टी ३६८ अंकांच्या घसरणीसह २५, ८११ अंकांवर बंद झाला.आजच्या व्यवहारात ऑटो आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदविली.मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकही दिवसभर दबावाखाली होते.