नगर दक्षिण मतदारसंघात आम्हीच तुतारी वाजवणार

जयंत पाटलांचा दावा

पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांसोबत संनाद साधला. नगर दक्षिणमध्ये तुतारी वाजणार असा आत्मविश्वास यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच ज्योची मेटे यांच्या पक्षप्रवेशाबाबत कोणतीही माहिती नसल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील म्हणाले की, ज्योती मेटे यांच्य पक्षप्रवेशाबाबत अद्याप काही माहिती नाही. अजित पवार गटाने शिरूर मतदारसंघात आढळरावांना दिलेली उमेदवारी अद्याप निश्चित झालेली नाही. त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे, अशी माहिती आहे. भाजपामध्ये अनेक पक्ष एकत्र आहेत. तरी त्यांना नवीन पक्षांची गरज का भासते? भाजपाला त्यांच्या पक्षाबाबत आत्मविश्वास नाही का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पुण्यातून जयंत पाटील प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरु आहे. एखाद्या मित्रपक्षाशी बोलत असताना, जाहिरपणे वक्तव्य करणे योग्य होणार नाही. आमची आघाडीची बैठक, जागावाटप झाले की, सर्व पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतील. जागावाटपाच्या बैठकीनंतर सर्व पक्ष उमेदवार जाहीर करतील. लंके फार लोकप्रिय आहेत. ते जर निवडणुकीला उभे राहिले तर ते निश्चित निवडून येतील. लंके आमचे उमेदवार व्हावेत, त्याबबातील आवश्यक सोपस्कार आम्ही योग्यवेळी पूर्ण करू. योग्यवेळी आमचा निर्णय कळवू. नगर दक्षिण मतदारसंघात आम्हीच तुतारी वाजवणार. नगर दक्षिण मतदारसंघामध्ये आम्ही तुतारी वाजवल्याशिवाय गप्प बसणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top