नंदूरबार- नंदूरबार जिल्ह्यातील आष्टे गावातील काही डुकरांचा मृत्यू अफ्रिकन स्वाईन फिव्हरने झाला आहे. भोपाळ येथील राष्ट्रीय अतीसुरक्षित प्राण्याच्या साथरोगांविषयीच्या प्रयोगशाळेने हा अहवाल दिला आहे. या रोगाचा प्रसार होऊन तो मानवी वस्तीतही पसरू नये यासाठी नंदुरबार तालुक्यातील दहा किलोमीटरचा परिसर बाधीत म्हणून घोषित करण्यात आला आहे.
नंदूरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी या विषयी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, हा रोग जलदगतीने पसरणारा असून तो धोकादायक आहे. त्यामुळे नंदूरबार तालुक्यातील दहा किलोमीटरचा परिसर बाधित घोषित करण्यात आला आहे. या परिसरातील सर्व डुकरांची कत्तल करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी. त्यानंतर परिसर निर्जंतुक करावा. वराहपालन करणाऱ्या संबंधित व्यक्तींना हा रोग व त्याच्या प्रसाराविषयी माहिती द्यावी. हॉटेलमधील उरलेले अन्न डुकरांना खायला देऊ नये.