धायरी फाटा भागातील कार्यालयाला आग

पुणे – सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा परिसरात एका इमारतीतील खासगी कार्यालयात आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली. धायरी फाटा परिसरात तीन मजली ओम पॅलेस ही इमारत आहे. इमारतीत पहिल्या मजल्यावर सृष्टी डिझायनर या कंपनीचे कार्यालय आहे. कार्यालयात आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या सिंहगड रस्ता केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. कार्यालय बंद असल्याने जवानांनी रहिवाशांकडून चावी घेतली. कार्यालयात कोणी अडकले नसल्याची खात्री जवानांनी केली. त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांत जवानांनी आग आटोक्यात आणली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top