नवी दिल्ली – सिगारेट आणि शीतपेयांवरील जीएसटी वाढविण्याच्या मंत्रिगटाच्या शिफारशीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. जीएसटीचा करटप्पा वाढविण्याचा केंद्र सरकारचा हा डाव आहे. धनिकांना सूट आणि गरीबांची लूट, असे या सरकारचे धोरण आहे,अशा शब्दात राहुल गांधी यांनी एक्स पोस्ट करून सरकारवर निशाणा साधला.
एकिकडे कॉर्पोरेट कराच्या तुलनेत आयकरात झपाट्याने वाढ केली जात आहे. दुसरीकडे जीएसटीमध्ये वाढ करून सरकार जास्त महसूल मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे,असे राहुल गांधी म्हणाले.