- कृषी उत्पादन दर्जा
जैसलमेर – द्राक्षापासून तयार होणाऱ्या मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा देत वस्तू व सेवा करातून वगळण्याच्या महाराष्ट्राच्या मागणीला यश आले असून वस्तू सेवा कर परिषदेतमध्ये मनुका करमुक्त करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
वस्तू व सेवा कर परिषदेची ५५ वी बैठक २१ – २२ डिसेंबर रोजी राजस्थानातील जैसलमेर येथे आयोजित करण्यात आली होती.केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या परिषदेत देशभरातील सर्व राज्यांचे अर्थमंत्री, मंत्री सहभागी झाले आहेत.या परिषदेत महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे करत आहेत.हळद, गुळ याप्रमाणेच मनुके कृषी उत्पादन असल्याने त्याला वस्तू व सेवा करातून वगळण्याची शिफारस करण्यात आली होती. तिला परिषदेत मान्यता देण्यात आल्याने या आधी ५ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) असणारे मनुके आता करमुक्त झाले आहेत.