दौंडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

पुणे- दौंड तालुक्यातील कडेठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. लताबाई बबन धावडे (५०)असे मृत या महिलेचे नाव आहे.
भीमा नदीच्या पट्ट्यात असलेल्या दौंड तालुक्यातील कानगाव,हातवळण, नानगाव,कडेठाण आणि शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, गणेगाव,, वडगासादलगावव रासाई या भागांत बिबट्याचा वावर वाढला आहे. कडेठाण येथील लताबाई धावडे यांच्यावर संध्याकाळी बिबट्याने हल्ला करून त्यांना उसाच्या शेतात फरफटत नेले.या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.एका मजुराने आरडाओरडा केल्याने ही घटना उघडकीस आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत बिबट्याला जेरबंद करावे,अशी मागणी केली.त्यानंतर दौंडचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी परिसरात पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात येईल,अशी ग्वाही दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top